• Sat. May 3rd, 2025

शिवशक्ती परिक्रमा समाराेप:प्रीतमला डावलून मी कधीही राजकारण करणार नाही

Byjantaadmin

Sep 12, 2023

मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहीण आहे. तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राने, पक्षाने आणि जगाने हे समजून घ्यावे. प्रीतम मुंडे उचलून मी स्वःला बसवणार नाही, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे या आगामी बीड लाेकसभा लढवणाार या चर्चेला अखेर त्यांनीच बोलताना विराम दिला आहे.

 

सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचा समारोप सोमवारी परळीत झाला. परळी येथील परिक्रमेच्या सांगता कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, २०१९ मध्ये जेवढी माझी शक्ती होती, तेवढी २४ मध्ये असेल की नाही सांगता येत नाही पण प्रार्थना करते की, मी जशी शुन्य झाले आणि नंतर स्वतःला घडवले तसे प्रीतमने स्वतःला निर्माण करावे. माझा तिला आशीर्वाद आहे. शिवशक्ती परिक्रमेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांचे खूप प्रेम मिळाले. यात कसेलही शक्तिप्रदर्शन नव्हते. ही शक्तीच होती, त्याचे प्रदर्शन मांडण्याची गरज नाही. राजकारण, समाजकारण करत असताना सत्व, तत्व, ममत्व मला महत्वाचे वाटतात, परिक्रमेचा धागा सात्विकतेच्या धाग्याने जोडला होता.

परिक्रमा केवळ परिक्रमा नाही तर पराक्रम ठरणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पक्षातून कशाप्रकारे बाजुला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आपण दोन महिने राजकारणापासून बाहेर राहणार असल्याचे सांगितले होते. त्याानंतर पंकजा यांनी शिवशक्ती यात्रा सुरू केली. पंकजा यांच्या यात्रेला राज्यामध्ये अनेक ठिाकणी प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. आता पंकजा यांची पुढील रणनीती काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

आपल्याला उज्ज्वल भविष्य घडवायचंय
मला जग जिंकू द्या. बारीकसारीक गोष्टीत पाडू नका. मला मोठं काम करू द्या, तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुमची सेवा करत राहीन. मोठी स्वप्नं बघा, मोठी स्वप्नं जगा, मोठा आशीर्वाद द्या, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं सांगून पंकजा म्हणाल्या, मी जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकू नाही दिले तरीही इतिहास घडेल. माझी भूमिका कधीच अयशस्वी ठरणार नाही. आता इलेक्शन तोंडावर आलंय, आता एक एक अंश व्हायचंय आपल्या या शक्तीचा..आपल्याला उज्ज्वल भविष्य घडवायचंय, त्यासाठी पाठीशी उभं राहून आशीर्वाद द्या. असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी या वेळी बोलताना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *