ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधींनी तत्पर राहणे आवश्यक… आ. संभाजीराव पाटील निलंगेकर.
शिरूर अनंतपाळ :- लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकहिताची भूमिका आणि विकासाकरिता लोकप्रतिनिधींनी सातत्याने कार्यरत असायला हवे,केवळ गावाचा विकासच नव्हे तर गावच्या आणि लोकांच्या समस्या ही सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्पर राहिले पाहिजे, असे मत माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील तळेगाव बोरी चे लोकनियुक्त सरपंच अक्षय व्यंकटराव पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष मंगेश पाटील हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुकाध्यक्ष प्रकाश कोरे,जेष्ठ नेते संजय दोरवे,नवनाथ डोंगरे उपस्थित होते.
गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक,समाज मंदिरे, ग्रामपंचायत इमारत यासह गावांतर्गत रस्त्यांसाठी आवश्यक त्या निधीची घोषणा केली.
गावच्या विकासासाठी पाठपुरावा आवश्यक असून गावच्या विकास कामांमध्ये कोणतीही अडकाठी येऊ देणार नाही असा विश्वास देखील आ. निलंगेकर यांनी ग्रामस्थांना दिला. या प्रसंगी सरपंच अक्षय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण केले.
कार्यकृमाचे प्रास्ताविक शकील देशमुख यांनी केले.सुत्रसंचालन काळे सरांनी तर आभार सचीन सुरवसे यांनी मानले.यावेळी विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे,उपसरपंच लक्ष्मण गायकवाड,संतोष शेटे,पंडीत शिंदे,
प्रल्हाद मोहिते,अनिल शिंदे, सोसायटी चेअरमन अशोकराव सुरवसे,उत्तमराव सुरवसे,भागवत एकोर्गे,बापुराव बुरंगे, बालाजी सुर्यवंशी,ज्ञानेश्वर पाटील, राजु जाधव, संतोष सारंगे,श्रीधर शिंदे, ग्रा. पं. सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.