• Thu. Aug 14th, 2025

महाराष्ट्रावर पुन्हा पाऊस रुसला, या तारखेपर्यंत राज्यभर कुठेही पाऊस नाही

Byjantaadmin

Sep 11, 2023

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबरच्या सुरुवातीला मात्र सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग आला. राज्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. पण आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ११ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. ७ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान सर्वत्र धुवांधार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला होता. यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला. पण अशात आता हवामान खात्याकडून पावसासंबंधी एक नवे अपडेट देण्यात आले आहेत. पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज आहे.

maharashtra weather forecast imd

 

आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढचे तीन दिवस पाऊस दडी मारेल. यावेळी जिल्ह्यांमध्ये उष्णता जाणवेल असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.बुधवारपासून मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानाने भागाने व्यक्त केली आहे. अर्थातच १३ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे. बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील विदर्भ विभागातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *