भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली समाजातील दर्बल घटकावर दबाव टाकण्याचे काम करते. आतापर्यंत भाजपच्या कृतीमध्ये हिंदुत्वासाठी काहीही नसते. सत्तेत येण्यासाठी भाजपची काहीही करण्याची तयारी असते, असा घणाघात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी केला आहे. ते पॅरिसमधील पीओ विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. परदेशातून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा तिखट टीका केल्याने भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.भाजप सांगत असलेल्या हिंदुत्वाचा आणि खऱ्या हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नसल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. ते म्हणाले, “मी हिंदूसंबंधित पुष्कळ पुस्तके वाचलेली आहेत.
यात गीता, उपनिषेधांचाही समावेश आहे. तसेच अनेक हिंदुत्वाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींशी चर्चा केली. त्यावेळी लक्षात आले की, भाजप हिंदुत्वासाठी काहीच करत नाही. ते फक्त मतांसाठी हिंदुत्वाचा वापर करतात.”भाजपची सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू असल्याची टीकाही राहुल गांधीं यांनी केली. मी केलेल्या अभ्यासानुसार हिंदुत्व कधीही आपल्यापेक्षा दुर्बलांवर अन्याय करण्यास अनुमती देत नाही. भाजप मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली समाजातीव दुर्बल लोकांमध्ये दहशत निर्माण करते. त्यांनी केलेला ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. भाजपने खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी काहीही केलेले नाही. भाजपला काहीही करून सत्तेत यायचे आहे. सत्तेत येण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना हिंदूचे काहीही देणे-घेणे नाही. मतांसाठी समजातील दबलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ते कायम तत्पर असतात,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधींनी यापूर्वीही अमेरिकेतून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी देशाची बदनामी करत असल्याची टीका भाजपने केली होती. भाजपने मोठा गदारोळ घालत राहुल यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पॅरिसमधूनही गांधी यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. राहुल गांधींच्या या टीकेला भाजप सडतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे. आता भाजपकडून गांधी यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर मिळणार, राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.