शाहरुख खानचा ‘जवान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात बऱ्याक गंभीर समस्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. शेतकरी आत्महत्या, आरोग्य सुविधा, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटातून भाष्य केलं आहे. कदाचित आता यामुळेच या चित्रपटाला एक राजकीय वळण मिळालं आहे.कित्येकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या कलाकारांनीही शाहरुखच्या स्टारडमचं अन् बॉक्स ऑफिसवर त्याने केलेल्या कमाईचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी याला राजकीय रंग द्यायला सुरुवात केली आहे.
यासगळ्यात कॉग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश यांनीही ‘जवान’चा आधार घेतBJP सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यंतरी ‘गदर २’ या चित्रपटाचं संसदेत २ दिवस स्क्रीनिंग केलं गेलं हाच मुद्दा घेऊन जयराम रमेश यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “काही दिवसांपूर्वी नव्या संसद भवनात ‘गदर २’चं स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता मोदी सरकारमध्ये ‘जवान’चं स्क्रिनिंग संसदेत आयोजित करायची हिंमत आहे का?” असा रोखठोक प्रश्नच त्यांनी विचारला आहे.शाहरुखने खूप वर्षांनी इतक्या उघडपणे एवढ्या गंभीर विषयांवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काहींनी त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे तर काही लोक त्यावर आपल्या राजकरणाची पोळी भाजू पहात आहेत. ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे.
Gadar-2 was shown in the new Parliament building a few days back. Will the Modi Sarkar have the courage to screen Jawan as well?
नए संसद भवन में कुछ दिन पहले गदर-2 दिखाया गया था। क्या मोदी सरकार में जवान की भी स्क्रीनिंग कराने की हिम्मत है?
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 9, 2023