वसुंधरा ट्री फाउंडेशनने बाभळगाव निवासस्थानी घेतली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट
फलोद्यान क्रांती ज्योत यात्रेची माहीती देत केली चर्चा.
लातूर प्रतिनिधी-१० सप्टेंबर २०२३
मुंबई येथील वसुंधरा ट्री फाउंडेशन च्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त इंडिया गेट दिल्ली-सरदार वल्लभभाई पटेल नगर (केवडिया) गुजरात- संभाजीनगर ( औरंगाबाद )अशी फलोद्यान क्रांती ज्योत यात्रा काढन्यात आली आहे. सदरील यात्रा रविवारी बाभळगाव येथे पोहोचली असता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याने विलासबाग येथे येऊन माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.
त्यानंतर यात्रेत सहभागी सर्वांचे बाभळगाव निवासस्थानी स्वागत करून,त्यांच्याशी चर्चा केली आणि यात्रेचा उद्देश व इतर विषयाची माहिती जाणून घेतली. यावेळी वसुंधरा ट्री फाउंडेशनचे अध्यक्ष कृषीभूषण गोविंदराव पवार, आदर्श भोसले, संजय गायकवाड, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव तसेच वसुंधरा ट्री फाउंडेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते