निलंगा विधानसभा युवक काँगेसच्या सोशल मीडिया उपाध्यक्ष पदी आदेश जरीपटके यांची नियुक्ती
निलंगा-निलंगा विधानसभा सोशल मीडिया उपाध्यक्ष पदी आदेश जरीपटके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे व अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया चे युग आहे.यामध्ये देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया ही गोदी मीडिया झाली असून आपण येणाऱ्या काळात या मोहिमेच्या विरोधात आपल्या सोशल मीडिया,युट्युब,फेसबुक,इन्स्टा ग्राम च्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार,ध्येय व धोरण सामान्य जनतेपर्यंत पोहचवून देशाचे नेते श्री.राहुल गांधी यांना पंतप्रधान पदी निवड होण्यासाठी कार्य करावे व स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे धर्मनिरपेक्षवादी विचार रुजविण्याचे सदैव कार्य करावे असे ते म्हणाले यावेळी निलंगा सोशलमीडिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर, होसुरचे पांडुरंग बिराजदार,सोहेल शेख,अमोल भोसले,दिगंबर काळे,सहदेव भोसले, सचिन गायकवाड,अभिजित जरीपटके अमोल दूधभाते,तुषार माकने,राकेश बानाटे, सागर जरीपटके,तुषार सोमवंशी,युवराज रुपनर, बाबर शेख,विनोद मुंगनाळे, जुबेर शेख, आदी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.