मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवा निमित्त “एक घर एक झाड “लावा-सौ.संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- वसुंधरा ट्री फौंडेशन,मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव पवार हे इंडिया गेट नवी दिल्ली सरदार वल्लभाई पटेल,केवडीया गुजरात,मराठवाडा औरंगाबाद येथून दि.15 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यात विशेष मराठवाड्यामध्ये मराठवाडा हेद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवनिमित्त ‘फलोद्यान क्रांती ज्योत’ मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करून अभिवादन करीत असताना आज निलंगा येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पफुलें वाहून अभिवादन केले वसौ.संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांना वृक्ष देऊन सन्मानित केले. तर यावेळी बोलताना सौ.संगीताताई निलंगेकर म्हणाल्या की,वृक्षारोपण करणे हे अत्यंत काळाची गरज असून ‘एक घर एक झाड आपल्या दारी, ऑक्सिजन आपल्या घरी’अशी संकल्पना त्यांनी व्यक्त करून आज आपल्याला खरी गरज आहे ती पाण्याची.जर आपण झाडे लावली तर पावसाचे प्रमाण वाढणार आहे खऱ्या अर्थाने जलसिंचनाचे जाळे स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात पसरविले आहे.ते कायम राहण्यासाठी प्रत्येकांनी एक तरी झाड लावले पाहिजे असे ते म्हणाल्या.
यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, विर लहुजी शक्ती सेनेचे गोविंदराव सूर्यवंशी,निलंगा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,रजनीकांत कांबळे,सोहेल शेख इ उपस्थित होते.