दयानंद कला महाविद्यालयात वंदू गुरुरायांना कार्यक्रम संपन्न
दयानदं कला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन ‘वंदू गुरुराया’हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाकडून नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या केले गेले.
प्रथमत: सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांना पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षक दिन हा खऱ्या अर्थाने शिक्षकाने आत्मपरिक्षण करण्याचा दिवस आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम हे प्रथमत: शिक्षक होते. त्यांनी आपल्याला एक नवा आदर्श घालून दिला. शिस्त, क्षमा, कर्तव्य याची सुरूवात सर्वांनी स्वत:पासून करुन घ्यावी. शिक्षकांनी आत्मबोध, आत्मज्ञान, आत्मपरीक्षण करुन आतंरात्म्याचा आवाज ओळखून आपले कर्तव्य पार पाडावे. हे कर्तव्य महान कसे होईल या कडे सर्वांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात दोनच हिरो असतात एक म्हणजे वडील व दूसरे शिक्षक. या दोघांच्या मार्गदर्शनानूसारच विद्यार्थी घडत असतो. शिक्षक हा खूप भाग्यवान आहे. की त्यांचा पुनर्जन्म ज्ञानाच्या, विद्यार्थ्यांच्या व पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून होत असतो.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे नमूद केले. सर्वांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करणे आवश्यक आहे. आणि हाच विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा. आजच्या फोर जी फाईव्ह जी च्याजगात गुरुजी चे महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे. पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना शिक्षकांमध्ये उत्साह असणे गरजेचे आहे आणि त्या उत्साहामध्येच शिक्षकांनी अध्यापन करावे विद्यार्थ्यांनी आई हाच आपला पहिला गुरु मानावा व आई वडील व शिक्षक यांच्या ऋणात राहूनच आपल्या आयुष्याची सुरुवात करावी व ऋणात राहणेच पसंत करावे. कारण ज्यांच्याकडून आपल्याला शिकता येते ते सर्व आपले गुरु असतात हे विद्यार्थ्यांनी विचारात घ्यावे. संस्कृत विषयाचे प्रा. चंदेश्वर यादव यावेळी असे म्हणाले की, शिक्षक व अध्यापक यामध्ये कोणतेही अंतर न करता संस्कृतीनुसार दोघांनाही महत्त्वाचे स्थान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश जोशी यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती केलेल्या अभिवादन पर फोटोचे पोस्टर प्रदर्शन ही पार पडले . प्राप्ती शिंदे व प्रणिता गरगडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी नानजकर व आभार कार्तिक लव्हरे यांनी मानले.
दयानंद कला महाविद्यालयात वंदू गुरुरायांना कार्यक्रम संपन्न
