• Sun. May 4th, 2025

दयानंद शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही लातूर पॅटर्न निर्माण करेल-ना. संजय बनसोडे

Byjantaadmin

Sep 9, 2023

दयानंद शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही लातूर पॅटर्न निर्माण करेल.
दयानंद बॅडमिंटन अकॅडमी मध्ये ऑलम्पिक खेळाडू तयार होतील.

  • मा. ना. संजय बनसोडे- युवक  कल्याण व क्रीडामंत्री

दयानंद शिक्षण संस्था व मारवाडी शिक्षण संस्था संचलित एस.एम.आर. बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन अकॅडमीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी आपल्या  उद्घाटनपर भाषणात मा.ना.संजयजी बनसोडे यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. भविष्यात ऑलिंपिक मध्ये खेळाडूचा दबदबा वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ त्याचबरोबर पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला.लातूर पॅटर्न केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे येत आहे असे नाही तर येणाऱ्या काळात विविध खेळांच्या क्षेत्रातही लातूरचे नाव लौकिक होईल. असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दयानंद शिक्षण संस्था व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण अशा राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य व नैपुण्य  खेळाडूंना लातूर शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचा नाविन्यपूर्ण मानस हा खरोखर प्रशंसनीय आहे. लातूरचा उदगीर येथील खेळाडू नागेश चामले व इतर खेळाडूंच्या पालकांनी श्री अमोल शिंदे, पुणे व डॉ. लालासाहेब देशमुख, निलंगा यांनी त्यांच्या पाल्यामध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल याबाबत पालकांनी कार्यक्रमात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बाहेर येऊन लातूर शहरांमध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडूंचा ओघ उत्तरोत्तर वाढत आहे ही अत्यंत वैविध्यपूर्ण बाब आहे. असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्थेने सर्व प्रकारच्या सुख-सोईयुक्त व मैदाने उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याबरोबरच पारंपारीक खेळ व आधुनिक विविध क्रीडा प्रकाराची मैदाने उभी केली आहेत. त्याचा एक भाग म्हणजेच सुसज्य असे क्रिकेट मैदान. त्यासाठी आवश्यक  प्रेक्षक गॅलरी व फ्लड लाईट करिता मा. ना. संजयजी बोनसोडे यांनी रु.2.75 कोटीची मदत जाहीर केली. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश गौड याला रोख एक लक्ष रुपयाचा धनादेश देऊन सन्मानीत केले.
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमण लाहोटी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेश बियाणी, संयुक्त सचिव मा. श्री. सुरेश जैन, मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शैलेश लाहोटी, मारवाडी शिक्षण संस्था सचिव मा. ॲड. अशिष बाजपाई यांच्यासह संस्था पदाधिकरी, नियामक व विश्वस्त मंडळ, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा पंडित यांनी तर आभार क्रीडा शिक्षक डॉ. महेश बेंबडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *