• Thu. May 1st, 2025

आज १६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकारिता दिन

Byjantaadmin

Nov 16, 2022

आज १६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकारिता दिन

दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने ४ जुलै १९६६ रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी काऊंसिलचे काम सुरू झाले. म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा होऊ लागला.

हिकीचे ‘बेंगॉल गॅझेट’ हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात १७८० साली सुरू झाले. त्यानेच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२ मध्ये मराठीत ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. दरम्यानच्या काळात हिंदी व अन्य भारतीय भाषा मध्ये अनेक वृत्तपत्रे देखील सुरू झाली. भारतातील पत्रकारिता तंत्रज्ञान व गुणवत्तेत एका दिशेने व वेगात विकास व्हावा म्हणून ‘प्रेस काऊंसिल’ स्थापन झाले. मात्र ते परिणामकारक ठरले नसल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पत्रकारिता हे एक मिशन होते. मात्र स्वातंत्र्या नंतर ते उत्पादन बनले. आणीबाणीच्या वेळी तर पत्रकारितेवर काही निर्बंध लादले गेले होते. मग भ्रष्टाचार निर्मूलनासाठी पत्रकारिता पुन्हा मिशन बनली. सध्या सर्व सामाजिक दुष्परिणामांसाठी केवळ माध्यमांना दोष देणे योग्य नाही. बदलत्या काळाच्या या परिस्थितीत माध्यम समाजाला नवी दिशा देतात. मीडियाचा परिणाम समाजावर होतो. त्यामुळे त्यांची भूमिका तितकीच महत्वाची ठरते. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने देशातील बदलत्या पत्रकारिचे तोपर्यंत स्वागतार्ह आहे जोपर्यंत ती आपली मूल्ये आणि आदर्शांची सीमा राखत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *