• Thu. May 1st, 2025

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटींचा चुराडा : शिवसेनेचा रोख कुणाकडे?

Byjantaadmin

Sep 8, 2023

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह राज्यातील अनेक नेतेमंडळींनी गेल्या वर्ष-दोन वर्षांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट फुटला तेव्हा ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणेने विरोधी पक्षांनी रान उठवले होते. भाजपने ऑपरेशन लोटस राबवत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होत्या. विरोधी पक्षाचे आमदार फोडून त्यांची सत्ता उलथवणे हे फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशभरात होत असल्याचा दावाही विरोधी नेतेमंडळींकडून होत आहे.

अशातच ठाकरे गटाने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य करतानाSHIVSENA नगरसेवक फोडण्यासाठी हे ७०० कोटी खर्च केल्याचा दावा आहे.

“आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी तोडगा निघणे गरजेचे आहे. तातडीचे अनुदान, पीकविमा, वीजबिल माफी यावर निर्णय होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट आहेच. त्यामुळे ‘टँकर्स’ वाढवावे लागतील. जनावरांच्या चारापाण्याबाबत सरकार काय उपाय करणार आहे? मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवर सुरूच आहे.” असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. ही उधळपट्टी थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांचे प्राण वाचविण्यासाठी खर्च करायला हवा.” अशी मागणीही शिवसेनेच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.) परंतु कोणत्या पक्षाने हा खर्च केला हे मात्र नमूद करण्यात आलेले नाही. पण अग्रलेखातून ठाकरे गटाने हा दावा करत थेट सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील एखाद्या पालिकेतील नगरसेवक फोडण्याचं हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याची चर्चा आहे. NAGARVIKAS ने उधळपट्टी सुरू केल्याचाही दावा केला आहे. ही उधळपट्टी थांबवून तोच पैसा दुष्काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी देण्याचा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *