भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा काढली आहे. या निमित्त पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. संविधानिकदृष्ट्या मराठा तरुणांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर राज्यातील मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याची विनंतीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरक्षणाच्या घोषणेवर पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. कोणीतरी घोषणा करून, आरक्षण मिळणार नाही, संवैधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असंही पंकजा यावेळी म्हणाल्या.
ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही
मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. त्यासाठी विद्वानांची अभ्यासक कमिटी नेमली पाहिजे. मात्र, त्यात राजकीय हस्तक्षेप नसावा, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. समितीने निर्भिडपणे परिस्थिती मांडली पाहिजे. मराठा समाजाला विश्वासात घेवून आरक्षण दिले पाहिजे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणे