• Thu. May 1st, 2025

ना. संजय बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या;तातडीने कार्यवाही करण्याच्या संबंधित विभागांना सूचना

Byjantaadmin

Sep 7, 2023

ना. संजय बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या; तातडीने कार्यवाही करण्याच्या संबंधित विभागांना सूचना

लातूर, दि. ७ (जिमाका) : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शासकीय विश्रामगृह येथे तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याठीकणी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून समस्यांचा निपटारा करण्याच्या सूचना ना. बनसोडे यांनी दिल्या.

माजी आमदार गोविंदराव केंद्रे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपविभागीय कृषि अधिकारी एन. आर. काळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सायस दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. डी. देवकर, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठ्याच्या समस्या, महावितरणशी संबंधित समस्या, शहर व गावातील अंतर्गंत रस्ते, वैद्यकीय मदत आदी विषयाच्या समस्या, निवेदने सादर केली. ना. बनसोडे यांनी प्रत्येकाशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *