माझ्या कारखान्याच्या खूप अडचणी चालू आहेत. खरं तर बऱ्याच लोकांच्या अडचणी आता मार्गी लावल्या आहेत. पण, माझ्या काखान्याच्या अडचणी मार्गी लावल्या नाहीत, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली शिवक्ती परिक्रमा करणाऱ्या PANKAJA MUNDE यांनी आज दुपारी सांगलीहून सांगोला मार्गे पंढरपूरला जात असताना माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी गणपत आबांच्या पत्नी रतनकाकी आणि आबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली. रतनकाकींच्या प्रकृतीची विचारपूसही केली.
मध्यंतरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अभिमान्यू पवार या भाजपच्या पाच नेत्यांच्या कारखान्यांना ५४९ कोटी ५४ लाख रुपयांचे ‘मर्जिन लोन’ मंजूर केले आहे. वास्तविक पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचे नाव मदतीच्या यादीत होते. मात्र, त्यांच्या साखर कारखान्याला मदत मिळू शकलेली नाही, त्यामुळे सांगोल्यात बोलताना त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रभारी म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्यावर ही जबाबदारी आल्यानंतर जवळपास दीडशे वेळा मी मध्य प्रदेशला गेली असेन. एक-दोन महिने अंतर्मुख होऊन मी विचार करणार आहे, असे तीन जुलै रोजी मी जाहीर केले होते. त्याला अनेक कारणे होती. काही वैयक्तीक, सार्वजनिक आणि काही राजकीय कारणं होती. त्या काळात मला अनेकांनी मेसेज केले की ‘काही असेल नसेल पण, ताई तुम्ही आमच्याकडे या.’काहीच झाले नाही, अशावेळी कसं जायचं. महाराष्ट्रात पक्षाची काहीच जबाबदारी नाही. आपण आमदार खासदार नाही. आपल्याकडे काही उदघाटनं नाहीत. कुठेही जाण्यासाठी कार्यक्रम लागतो ना. म्हणून मी शिवशक्ती परिक्रमा काढली आहे. मधल्या सुटीच्या काळात खूप वाचन केले. सगळे कायदे वाचून काढले. माझ्या कारखान्याच्या खूप अडचणी चालू आहेत. खरं तर बऱ्याच लोकांच्या कारखान्यांच्या अडचणी आता मार्गी लावल्या आहेत. पण, माझ्या काखान्याच्या अडचणी मार्गी लावल्या नाहीत. त्या अडचणीचं काय करता येईल म्हणून त्यासाठी वेळ दिला, असेही पंकजा यांनी नमूद केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात जेवढी ज्योर्तिलिंग आणि शक्तीपीठं आहेत, त्यांची श्रावण महिन्यात परिक्रमा करावी, असे मी ठरवलं होतं. त्याचं नाव ठरवलं नव्हता; पण ते शिवशक्ती परिक्रमा झालं. त्या परिक्रमेचे आता भव्य रूप झाले आहे
कोणत्या नेत्यांच्या कोणत्या कारखान्याला किती कोटी मंजूर झाले
१) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (शंकर सहकारी साखर कारखाना, माळशिरस, जि. सोलापूर) ११३ कोटी ४२ लाख रुपये
२) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (कर्मयोगी शंकररावजी पाटील-१५० कोटी, नीरा भीमा कारखाना ७५ कोटी, ता इंदापूर, जि. पुणे) २२५ कोटी
३) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (रामेश्वर कारखाना,भोकरदन, जि. जालना) ३४ कोटी ७४ लाख
४) भाजप आमदार अभिमन्यू पवार (शेतकरी कारखाना, किल्लारी, जि. लातूर) ५० कोटी,
५) खासदार धनंजय महाडिक (भीमा कारखाना, मोहोळ, जि. सोलापूर) १२६ कोटी ३८ लाख