इंडिया व भारत या वादामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी इंडिया आघाडीकडून या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे भारतात ‘जी २०’ शिखर परिषद होत आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय नेते मंडळींची रेलचेल नवी दिल्लीत असणार आहे. त्यामुळे अधिकृत मंत्री किंवा व्यक्तीनेच बोलावे बाकी मंडळींनी इंडिया भारत वादावर बोलू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीत दिला आहे. आगामी काळात दिल्लीतG20 होत आहे. त्यासाठी अनेक देशांचे नेते भारतात येत असल्याने भारतीय वृत्तपत्र आणि माध्यमात इंडिया भारताचा वाद दिसत आहे. त्यासाठी या विषयावर न बोलण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत. येत्या काळात इंडिया-भारत वादावर आरोप प्रत्यारोप करीत राहिल्यास त्याबद्दल नकारात्मक संदेश जगभरात पोचण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी मोदींनी भाजप नेत्यांना हा सल्ला दिल्याचे समजते.
दरम्यान, तामिळनाडुचे मुख्यमंत्री एक. के. स्टॅलिनचे पुत्र उदयनीधी यांनी सनातन धर्मावर टीकेची झोड उठवली. सनातन धर्मावर बोलल्याने देशभरातील भाजप आक्रमक झाले आहे. याची दखल खुद्द PM MODI दखल घेत टीका केली.या वेळी त्यांनी सहकारी मंत्र्यांना सनातन धर्मावर बोलण्यास मोकळीक दिली आहे. येत्या काळात इंडिया-भारतावर बोलल्याने मतांवर परिणाम होईल, म्हणून सनातनचा मुद्दा महत्वाचा मानला जात आहे. यावर बोलण्यास भर बैठकीतच पंतप्रधान मोदी यांनी परवानगी दिली असल्याचे समजते.