• Thu. May 1st, 2025

सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट;मात्र आंदोलन कायम

Byjantaadmin

Sep 7, 2023

जालना: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलनहे सुरूच राहणार असून त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ ला जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकर यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना शासनाचा जीआर दाखवला आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी सरकारच्या वतीने पुन्हा एकदा अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात पोहचले. तसेच यावेळी जीआरची कॉपी खोतकर यांनी जरांगे यांना दाखवली. ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्याचाच जीआर घेऊन खोतकर आले आहेत. तसेच मनोज जरांगे आणि खोतकर यांच्यात चर्चा झाली.

maratha reservation maharashtra govt arjun khotkar gr meet manoj jarange on hunger strike update Jalna : सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम

 

 सरसरट सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या

अर्जुन खोतकर यांच्या भेटीआधी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सर्व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. तसेच सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे. त, आमच्याकडे कुणाकडेच कुणबी असल्याची नोंदी नाहीत. त्यामुळे कालच्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही शांतपणे आंदोलन करत आहे. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत निजामकालीन पुरावे वाचून दाखवले आहेत. त्यात मराठा जाती समूहाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *