लातुर(प्रतिनिधी):-शिवसेनेच्या वतीने लातूर शहरामध्ये नेत्ररोग व आरोग्य चिकित्सा शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले
आज दिनांक सहा सप्टेंबर 2023 रोजी खाडगाव रोड लातूर येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेब व शिवसेना उपनेते सन्माननीय विश्वनाथ नेरुळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेला असून यापूर्वी शिरूर अनंतपाळ तालुका औसा तालुका निलंगा तालुका या भागामध्ये सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी म्हणजे 80 टक्के समाजसेवा २० टक्के राजकारण हे गृहीत धरून आज लातूर शहरांमध्ये खाडगाव परिसरात मित्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे या शिबिराचे उद्घाटक शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब होते तर संतोष सोमवंशी योगेश स्वामी विष्णू साठे बालाजी जाधव एस आर चव्हाण रमेश माळी सुनील बसपुरे माधवकल मुकले युवराज वंजारे सुधाकर कुलकर्णी दिलीप भांडेकर हनुमंत पडवळ राहुल रोडे रोहित दुपारे नागनाथ भांडेकर बालाजी गोरे समद शेख इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते