• Wed. Apr 30th, 2025

‘फडणवीस माफीनामा नको, राजीनामा द्या’; कोल्हापुरात मराठा आंदोलकांची आग्रही मागणी !

Byjantaadmin

Sep 5, 2023

जालना येथील मराठा समाज बांधवांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कोल्हापूरकरांकडून प्रचंड प्रतिसाद देत जालना येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला गेला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सकल मराठा समाज बांधावाकडून कोल्हापुरातील दसरा चौकात निषेध आंदोलन केले गेले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, फडणवीस राजीनामा द्या -राजीनामा द्या’, अशा घोषणा देत परिसर आंदोलकांनी दणाणून सोडले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, “राज्य सरकार प्रत्येकवेळी मराठा समाजाला फसवत आलेले आहे. जालनासारखा प्रकार हा सरकारने समाजावर केलेला अत्याचार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अन्यथा आज कोल्हापूर बंद केले आहे, उद्या महाराष्ट्र बंद करायला भाग पाडू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

ठाकरे गटाकडून काळ्या फिती –

जालना घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्यांचा निषेध करण्यासाठी आज सकल मराठा समाजाचे पदाधिकारी दसरा चौकात दाखल झाले. त्यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला. लाठीचार्जचे आदेश देणारे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली.महाराष्ट्रात एक फुल-दोन हाफ तिकिटाचे सरकार सुरु आहे. हे सरकारने मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले. तुमचा माफीनामा आम्हाला नको, आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी केली.

कोल्हापूर जिल्हाधिकारी मराठा समाजाच्या निशाण्यावर –

15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या पदाधिकारींसोबत बैठक झाली. या बैठकीवेळी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *