सोयाबीन पिकाला 25 टक्के विमा जाहिर झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा सरकारकडे पाठपुरावा
लातूर दि. 4.लातूर ग्रामीण मतदार संघातील लातूर , रेनापुर भागात सर्व महसूल मंडळात गेल्या एक महिन्यापासून पाउस नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असून यामुळे जनावरांचा चारा व पिण्याचा प्रश्न भेडसावत आहे यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 19 जुलै रोजी पीक विमा नुकसान भरपाई द्यावी यासाठी निवेदन दीले होते त्या पत्राची दखल जिल्हाधिकारी यांनी घेवून संबधित वीमा कंपनी कृषि विभाग यांना सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता त्यानंतर जिल्ह्यांतील सोयाबीन पिक वीमा धारक शेतकऱ्यांना 25टक्के आगाऊ अग्रिम देण्याबाबत अधिसूचना काढली आहे याबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
चालु खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी सोयाबीन तूर चे उत्पादन घेतले आहे मात्र गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे हाताला आलेले पीक गेले आहेत त्यामुळें शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले असून यासाठी राज्य शासन जिल्हाधिकारी यांच्याकडे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25टक्के अग्रीम जोखीम भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबधित पीक विमा कंपन्यांना दिले आहेत तशी अधिसूचना जारी केली आहे यामुळे लातूर ग्रामीण मतदार संघातील बहुतांश महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे सरकारने भरपाई दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत