जनावरांनाच्या बाजार जागेची मागणी:आ.संभाजीराव पाटील यांनी घेतली तात्काळ दखल
निलंगा:-येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित जनावरांच्या आठवडी बाजार साठी मुबलक जागा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी व्यापारी त्रस्त होते .येथील व्यापाऱ्यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना भेटून बाजार साठी मुबलक जागेची मागणी केली असता आमदार निलंगेकर यांनी त्वरित मागणीची दखल घेऊन निलंगा बाजार समितीची खुली जागा जनावरांच्या दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजार साठी उपलब्ध करून दिली आहे व याबाबत संबंधितांना सूचना ही दिल्या आहेत . गेल्या अनेक वर्षपासूनचा जागेचा प्रश्न निकाली काढल्याने येथिल व्यापाऱ्यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आभार व्यक्त करून सत्कार केला या प्रसंगी नगर परिषद माजी सभापती इरफान सय्यद व कुरेशी बिरादारीचे व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.