नाशिक:-शहरात ब्राह्मण समाजाचे कार्यालय मंजूर असूनही मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून कार्यालय पूर्ण हाेण्यासाठी अडवणूक केली जात आहे. याची दखल घेत, ‘मला त्या अधिकाऱ्यांची नावे सांगा, मी त्यांच्याकडे बघते’ अशा थेट इशारा अमृता फडणवीस यांनी अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यालयात दिला.
अ. भा. बहुभाषीय महासंघाच्या वतीने दीपावली स्नेहमेळाव्याचे आयाेजन साेमवारी (दि. १४) स्वामी नारायण बंॅक्वेट हाॅल येथे करण्यात आले हाेते. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून फडणवीस बाेलत हाेत्या. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, पुराेहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत भक्ती चरणदास, अॅड. अविनाश भिडे आदी मान्यवर उपस्थित हाेते. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही सर्व ब्राह्मण, बुद्धिजीवी असल्याचा गर्व आहे.
पण आम्हाला त्याचे मार्केटिंग करता येत नाही. मात्र हीच बाब हेरत देवेंद्र फडणवीस यांना माेदी यांनी मुख्यमंत्री केले. नाशिकमध्ये भारती पवार, सीमा हिरे, देवयानी फरांदे या तीन देवी आहे त्या माध्यमातून शहरातील अडचणी साेडवाव्या.
प्रारंभी सतीश शुक्ल यांनी ब्राह्मण समाजाच्या ठराव मांडत त्या राज्य व शासनाने पूर्ण कराव्या, अशी मागणी केली. तसेच शहरात साकारण्यात येणारे ब्राह्मण संघाचे कार्यालय पूर्ण करण्याबाबत लक्ष देण्याची मागणी केली. प्रास्ताविक अॅड. भानुदास शाैचे यांनी केले.