• Wed. Apr 30th, 2025

मराठा आंदोलनाची धग:बारामतीमध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा, ‘अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’च्या घोषणा

Byjantaadmin

Sep 4, 2023

जालना येथील आंतरवाली सरावटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा संघटनांकडून बंद पुकारण्यात आला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. तर, बारामती, निफाड येथेही बंदमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

LIVE UPDATES

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा मोर्चा समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते असलेले अनिल पाटील बनकर यांनी स्वतःच्या मालकीची दुचाकी पेटवून दिली. तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
सातारा येथील पवई नाका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.
सातारा येथील पवई नाका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.
सातारा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी बोलताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख
सातारा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी बोलताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख
  • राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना जालना पोलिस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. जालना लाठीचार्ज प्रकरणी ते चौकशी करणार आहेत. त्यांच्यासोबत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण देखील उपस्थित आहेत.
  • बारामतीत सकल मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या या मोर्च्यात अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
  • मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत आज 100 टक्के जीआर निघणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सकल मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. आंदरवरी सराटी येथील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतचा जीआर राज्य सरकार आजच जारी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
  • जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या निर्घृण लाठीमाराच्या निषेधार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा जिल्ह्यात सोमवारी (दि. 4) बंदचे आवाहन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी आज बंद पाळण्यात आलेला आहे. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात मराठा समाजाकडून निषेध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आंतरवली सराटी येथील मराठा आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ते आंतरवली सराटी येथे जाऊन आंदोलकांचीही भेट घेणार आहेत.
  • मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. सकाळी सव्वाआठ वाजता ते चिकलठाणा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर थेट आंदोलन स्थळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतील. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदलाही मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

नांदेडमध्ये आज पदयात्रा

सकल मराठा समाजातर्फे रविवारी (३ सप्टेंबर) नांदेडमधील हनुमान मंदिर मंगल‎ कार्यालय येथे एका बैठकीचे आयोजन‎ करण्यात आले होते. बैठकीत सर्वांनुमते सोमवारी (4 सप्टेंबर) जिल्हा बंदची हाक‎ देण्यात आलेली आहे.‎ राज कॉर्नरपासून छत्रपती शिवाजी‎महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत‎ सकल मराठा समाजाच्या वतीने ‎सकाळी पदयात्रेचे आयोजन‎केले आहे. ही पदयात्रा राज कॉर्नर,‎श्रीनगर, महात्मा फुले चौक‎(आयटीआय), शिवाजीनगर, कला ‎मंदिरमार्गे जाईल.‎

संभाजीनगरमधील बंदला राजकीय पक्षांचा पाठिंबा

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ 4 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर बंद असणार आहे. सकल मराठा समाजाने केलेल्या या आवाहनाला व्यापारी महासंघासह, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शहरातील बहुतांश आस्थापना बंद असतील. मात्र, आरोग्य सुविधा, परीक्षा केंद्रे, सकाळी 10 वाजेपर्यंत दूध व भाजीपाला व काही जीवनावश्यक बाबींना बंदमधून वगळण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. हा बंद शहर व जिल्ह्यात पुकारण्यात आला आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याला विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed