• Wed. Jun 18th, 2025

…तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही ; बीडच्या बेलवाडी ग्रामस्थांनी घेतली शपथ

Byjantaadmin

Sep 3, 2023

जालना जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचे पदसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अशातच कोणतेही आंदोलन न करता बीडमधील बेलवाडी गावच्या ग्रामस्थांनी एक वेगळीच शपथ घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, असा संकल्पच बेलवाडी ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे भाजपसाठी आता इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. इतकेच नव्हे तर, या ग्रामस्थांनी आपण मतदान करणार नसल्याचीही शपथ देखील घेतली आहे.

Belwadi News :

 

केंद्रात भाजपाची सत्ता आहे, आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो आणि केंद्रात भाजपा सरकार आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाहीत. अशी शपथ आता बेलवाडी येथील नागरिकांनी घेतली आहे.”आरक्षणासंदर्भात घेतला जाणारा निर्णय राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या वरची मर्यादा आरक्षणाने ओलांडली आहे त्यामुळे कायद्यात जो बदल करण्याचा निर्णयही केंद्र सरकारच घेऊ शकते. केंद्र सरकारने हा बदल करुन आम्हाला आरक्षण द्यावे. केंद्र सरकार कायद्यात बदल करुन आम्हाला आरक्षण देणार असेल तर आम्हीही त्यांच्यासोबत राहू. पण सरकार आरक्षण देणार नसेल तर यापुढे मराठा समाज म्हणून आम्ही भाजपाला मतदान करणार नाही, अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे,” असे एका गावकऱ्याने म्हटलं आहे.”2024 च्या loksabha election पर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही यापुढे भाजपाला मतदान करणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही भाजपाला मतदान करु. अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली आहे.जालन्यात  मराठा समाजाला आरक्षण  साठी उपोषण करणाऱ्या आंदोलक आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेत अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. याचे राज्यभर पडसाद उमटू लागले. जालना  जिल्ह्यातील सर्व एसटी बस बंद आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील जालन्यात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना शांततेत आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *