रमेश लांबोटे यांची ढोबळेवाडी-माचरटवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निटूर मोड येथे सत्कार
निलंगा ( प्रतिनिधी): – तालुक्यातील ढोबळेवाडी माचरटवाडी ग्रुप ग्रामपंचायत गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे तर उपाध्यक्षपदी उपाध्यक्ष लिंबराज वाघमोडे यांची निवड झाल्यामुळे आज निटूर मोड येथे परिसरातील शिरोळ ,वांजरवाडा, केळगाव येथील मित्र परिवार पत्रकार मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये रमेश लांबोटे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रतिष्ठित नागरिक लतीफ भाई चाऊस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी इशारा न्यूज चे संपादक के.वाय. पटवेकर, पत्रकार सलीउर्फ (मुन्ना) पठाण, लोकमत पत्रकार जावेद मुजावर, आवाज टी.व्ही. चे नामदेव तेलंग, व्यापारी पंकज भालके, इमाम सरदार, साबेर चाऊस, अझर चाऊस, माधव पाटील, सिद्दीक गस्ते स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.