• Tue. Apr 29th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांची शहर जिल्हा सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

Byjantaadmin

Sep 2, 2023
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांची शहर जिल्हा सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादला ला १०० वर्ष पूर्ण  शहर जिल्याचा दिला अहवाल*
लातूर -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादलला  शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या स्वयंसेवकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. आणि महाधिवेशनाचा अहवाल त्यांना दिला. मागच्या आठवड्यात २७ जणांचे  शिष्टमंडळाने  महाराष्ट्र सेवादलाच्या अधिवेशनासाठी राजगुरू तालुका खेड जिल्हा पुणे येथे  सहभागी झाले होते. शहीद शिवराम हरि राजगुरू यांच्या जयंती दिनानिमित्त सेवादलाचे  राज्य स्तरीय संमेलन राजगुरुनगर येथे संपन्न झाले. यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवादलाच्या  हजारो स्वयंसेवकांनी  शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या घरी जे राष्ट्रीय स्मारक आहे तेथे भेट देऊन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना दिली आणि आज शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या स्वयंसेवकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या नुतन पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दला उपाध्यक्ष म्हणून अँड सुनील गायकवाड  उपाध्यक्ष  व दक्षिण ब्लाॅक अध्यक्ष राहुल लालासाहेब देशमुख , सचिव रहीम शेख , शाम अंकुशे,यंग ब्रिगेड  पूर्व लातूर समन्वयक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी माजी आ. त्र्यंबकजी भिसे,लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, राज्य साखर संघाचे संचालक  आबासाहेब पाटील, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, संभाजी सुळ,‌स्नेहल राव देशमुख, शिवाजीराव कांबळे,  संभाजी रेड्डी, अँड प्रवीण पाटील ,सेवा दला चे सामाजिक न्यायव्यवस्था प्रमुख प्रा शिवाजी मोहाळे, सेवादल यंग ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मुन्वर शेख , विकास देशमुख, सेवादलाचे नितिन हारवाडीकर, कैलाश माने,  बप्पा मार्डीकर, यंग ब्रिगेडचे  प्रभाग १४ चे राजेश कासार हे  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed