भाजीपाल्याचे बिट रात्री ऐवजी सकाळी चालू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल युवासेनेची मागणी
निलंगा- शहरातील भाजीपाला मार्केटचे बीट रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
भाजीपाला मार्केटचे बीट, खरेदी विक्री रात्री अपरात्री दोन वाजता सुरू करण्यात येते, भाजीपाल्याची बिट रात्री ऐवजी सकाळी सहा वाजता सुरू करावा, शहरातील जुने बोरवेल विंधन विहिरी तात्काळ सुरुवात करण्यात यावे व पाणीपुरवठा पूर्ववत करावा, शहरातील खड्डे तात्काळ बुजून घेण्यात यावेत, शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन युवासेना, महिला आघाडी व शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. रात्री दोनचे बिट सकाळी सहा वाजता तात्काळ सुरू नाही केल्यास महिला आघाडी व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.यावेळी महिला उपजिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वंजारवाडे, महिला तालुका संघटिका सविता पांढरे,शहर प्रमुख देवता सगर,शकुंतला पाटील,नसरीन शेख, रंजना कदम,नंदा गाडे,शिवसेना विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख, सतीश धायगुडे, सोनू नागमोडे,संजय जाधव, बबलू सरतापे इत्यादी शिवसैनिक, महिला,युवासैनिक उपस्थित होते.