• Tue. Apr 29th, 2025

प्रणिती शिंदे यांचे लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

Byjantaadmin

Aug 29, 2023

माझी लोकं आणि त्यांचा आनंद ही माझी मोठी जबाबदारी आहे. तसेच, काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असे सांगून आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेची आगामी निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले. सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना mla shinde यांनी ‘भावी खासदार’ म्हणून लागलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीवर झालेली निवड हे सोलापूरकरांचे श्रेय आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. सोलापूरकरांच्या आशीर्वादामुळे हे मिळालं आहे.

solapur च्या काँग्रेस भवनासमोर चार दिवसांपूर्वी भावी खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा फ्लेक्स लागला आहे. तत्पूर्वी काँग्रेस वर्किंग कमिटीवर निवड झाल्याने प्रणिती शिंदे यांची यापुढची राजकीय इनिंग दिल्लीत असणार, अशी चर्चा रंगली आहे. तसेच, त्यांच्या उमेदवारीचा ठरावही सोलापूर मतदारसंघाच्या आढावा बैठकीत करण्यात आलेला आहे, त्यावर आमदार शिंदे यांनी आज आपले मत व्यक्त केले आहे.इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सज्ज आहोत. ज्या ज्या ठिकाणी इंडिया आघाडीची बैठक हेात आहेत, त्या ठिकाणी खूप मोठा फरक पडतो आहे.तुम्ही जो नवीन सर्व्हे बघितला आहे, तो इंडिया आघाडीच्या बाजूने जनमत झुकत चाललं आहे. पण, खूप काम करण्याची गरज आहे. देशभरातील लोकांसाठी आम्ही ते करत राहू, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.सरकार काम करायला लागले असता तर एवढी लोकं आमच्याकडे दिसलीच नसती. सरकार काम करायला लागले असते तर शेतकऱ्यांनी निषेध केलाच नसता. सरकार काम करायला लागले असते तर रेशन दुकानात सणासुदीची साखर तरी दिसली असती. साखर सोडा धान्य पण नाहीये. सरकार काम करायला लागले असते तर सोलापुरात पाणी मिळालं असतं. आतापर्यंत राज्यात दुष्काळ जाहीर केला असता, शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. राज्यात कोणते काम चालू आहे? यांचे फक्त खोके गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed