• Tue. Apr 29th, 2025

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाला चिरडलं; 4 जागीच ठार

Byjantaadmin

Aug 28, 2023

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाला चिरडलं; 4 जागीच ठार

उमरगा: गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासनाने उपाययोजना करुनही अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. परिणामी लाखो लोकांना दरवर्षी आपला जीव गमवावा लागतो.

अशाच एक भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हा भीषण अपघात घडला आहे. ऍप्पे रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भयानक होता की यात रिक्षामधील 4 प्रवासी जाग्यावरच ठार झाले तर 3 गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील सुंदरवाडी येथील रहिवाशांचा अप्पे ऑटोला तळमोड नजीकच्या कर्नाटक सीमेवर कर्नाटक हद्दीत भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ऑटो मधील चौघाचा मृत्यू झाला असून तीन जखमी आहेत तर एक बालक सुखरूप आहे.

ही घटना सोमवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ऐन सीमेवर कर्नाटक हद्दीत घडली.मृतांमध्ये ऑटो चालकसुनील महादेव जगदाळे, चालक (वय 40)रिक्षा चालकाची पत्नी बायको प्रमिला सुनील जगदाळे (वय 35)सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय 70)पूजा विजय जाधव, (वय 18, भाची) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर गीता शिवराम जगदाळे (वय 35) गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे. दुसऱ्या लग्नासाठी बापाने पोटच्या लेकाची दिली सुपारी, मृतदेह आढळल्यानं खळबळअस्मिता शिवराम जगदाळे (वय 11), लक्ष्मी सुनील जगदाळे (वय 11) हे किरकोळ जखमी असून एका बालकाला काहीच झाले नाही. मृत सुनील हे आपल्या मालकीच्या (MH24- M –1319) या आप्पे ऑटोमधून देवदर्शनाकरिताशेजारील कर्नाटक मधील अमृत कुंड येथे गेले होते. देवदर्शन करुन परत येताना हैद्राबादहुन सोलापूरकडे जाणाऱ्या (KA56- 0575) ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. मृत सुनील यांचे कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed