• Fri. May 2nd, 2025

लातूरच्या डॉ. अभय कदम यांची निवड ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर असो. च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड 

Byjantaadmin

Aug 28, 2023
लातूरच्या डॉ. अभय कदम यांची निवड ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर असो. च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड
लातूर :  लातूर येथील डॉ. अभय कदम यांची निवड ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर असो. च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. देशभरातील २६ राज्यातील १५० हून अधिक प्रतिनिधींनी सदर निवड केली असू‌न मुंबई येथे झालेल्या सेंट्रल जनरल कौन्सिल बैठक व कार्यशाळेत संघटनेने हा निर्णय जाहीर केला.
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्मेंट डॉक्टर असोसिएशनचे देशभरात २६ राज्यात दीड लाखाहून अधिक गव्हर्मेंट डॉक्टर सभासद आहेत
मुंबई येथे झालेल्या या कार्यशाळेत ‘व्हायलन्स अगेनस्ट डॉक्टर्स’ या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनची सेंट्रल जनरल कौन्सिल बैठक २५ व २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हॉटेल सोफिटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ‘डॉक्टरांवरील हिंसाचार’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रानंतर केंद्रीय जनरल कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी भारतीय वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील सेवा कोटा, गतिमान  करियर प्रगती इत्यादी मुद्द्यांवर राज्यभरातील प्रतिनिधींनी चर्चा केली. नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने सन्मान राखण्यासाठी, हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, वेतनातील समानता यासाठी लढण्याचा संकल्प केला आहे.देशभरातील सरकारमध्ये कार्यरत डॉक्टरांसाठी सेवा शर्ती, सर्व राज्यांमधील क्षेत्र, महासंघ हे मुद्दे केंद्र आणि राज्य सरकारकडे  समोर सादर करतील आणि सर्व प्रकारच्या असमानता, अन्याय, शोषण आणि सरकारी डॉक्टरांवरील हल्ल्यांविरुद्ध देशभर आंदोलन करेल. असा एकमुखी ठराव करण्यात आला.या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डाॅ. तानाजीराव सावंत म्हणाले, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्मेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेने अत्यंत उत्कृष्ट काम केले असून देशभरातील गव्हर्मेंट डॉक्टर एकत्र आल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील.  डॉ. अभय कदम यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केल्यामुळे देशभरात संघटनेचे कार्य अत्यंत उत्कृष्ट होईल.केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून गव्हर्मेंट डॉक्टरांना वेतनसेवा देण्याबाबत व डॉक्टरांच्या वर होणारे हल्ले रोखण्यासाठी योग्य तो कायदा करण्याबाबत शासन पाठपुरावा करेल ‘व्हायलन्स अगेनस्ट डॉक्टर्स’ या बाबत महाराष्ट्र शासन पुढाकार घेऊन केंद्राकडून योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
                यावेळी  माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश खयालिया (हरियाणा) ,सरचिटणीस रणजित कुमार (बिहार ), डॉ माधव हसाने (मध्यप्रदेश), डाॅ.सुवर्ण गोस्वामी (पश्चिम बंगाल),डॉ. मित्तल (दिल्ली), डॉ. प्रफुल्ल कुमार (दिल्ली) ,डॉ. रूफ (केरळ),डाॅ.जयदीर (आंध्र प्रदेश), डॉ. किरण (तेलंगणा) ,डॉ.बाला सुब्रमण्यम (तमिळनाडू) ,डाॅ.अर्षद (जम्मू काश्मीर), डॉ. तबा खन्ना (अरुणाचल प्रदेश) व महाराष्ट्र राज्य मॅग्माचे उपाध्यक्ष डॉक्टर बी व्ही जाधव व सचिव एस एस हिंडोळे व वरिष्ठ सल्लागार डी के सावंत यांच्यासह २६ राज्यातील १५० प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते
  लातूरच्या सुपुत्राचा देश पातळीवर सन्मान 
लातूर शहरापासून जवळच असणाऱ्या  मळवटी गावचे सुपुत्र डॉ.  अभय वसंतराव कदम यांची ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड एकमताने झाल्याने लातूरचा देश पातळीवर सन्मान झाला आहे. दीड लाखाहून अधिक सभासद असलेल्या गव्हर्मेंट डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून लातूरच्या सुपुत्राला मिळालेली ही संधी नक्कीच अभिमानास्पद आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. कदम यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *