• Sat. May 3rd, 2025

जानाई प्रतिष्ठानने १४० कुटुंब उभे केले

Byjantaadmin

Aug 28, 2023
जानाई प्रतिष्ठानने १४० कुटुंब उभे केले
 ‘जानाई ‘च्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक कुर्रर्र नाट्य प्रयोगास प्रतिसाद
लातूर ; दि.२८ ( वृत्तसेवा ) -प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी लातूर शहरातील श्री जानाई प्रतिष्ठान तर्फे या वर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. धमाल विनोदी ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने लातूरकरांना मनोरंजनातून मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील कलाकार विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि पॅडी कांबळे यांनी या नाटकात अक्षरशः विनोदाचा धुमाकूळ घातला.गरजू हुषार व होतकरू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी गेल्या २३ वर्षात जानाई ने या प्रकारचे २३ विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यातून उभा राहिलेल्या निधीतून आतापर्यंत १४० विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे तर यावर्षी ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यावर्षी च्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अमोल देवरे सहकुटुंब उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. देवरे, जानाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. गौरी कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री. दिलीप रांदड, सचिव श्री. अमोल बनाळे, मंडळाचे संस्थापक सदस्य श्री. सुनिल अयाचित, श्री. संजय अयाचित यांनी दीप प्रज्वलनाने केली.त्यानंतर नाटकाच्या मध्यंतरात छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम करण्यात आला, ज्याचे सूत्रसंचालन डॉ. ऋजुता अयाचित यांनी केले. श्री जानाई मातेच्या प्रतिमा पूजनानंतर कलाकारांचं जानाई परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं स्वागत विद्यार्थी मंडळाची कोषाध्यक्ष कु. श्रेया कुलकर्णी हिने शाल, पुष्प, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन केले. विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष चि. गौरव कुळकर्णी याने अभिनेते प्रसाद खांडेकर तर चि. व्यंकटेश वाघ याने अभिनेता पॅडी कांबळे यांचं स्वागत केलं. अभिनेत्री नम्रता संभेराव यांचं स्वागत कु. कांचन इस्लामपूरे हिने केले.१४० विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. जानाईमुळे मिळालेली मदत आणि त्यामुळे बहरलेलं आयुष्य याचा लेखाजोखा त्याने प्रेक्षकांसमोर मांडला.
कलाकारांतर्फे विशाखा सुभेदार यांनी जानाई च्या कार्यास शुभेच्छा देताना, जानाईच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. “समाजसेवा करणे सोपी नसते, आपण सगळे कर्णाचे अवतार आहात. एखाद्या घरामध्ये एक मुलगा सांभाळता सांभाळता आपल्याला नाकी नऊ येते ; परंतु 140 हून अधिक विद्यार्थ्यांना उभे करणे हे तसे सोपे काम नाही. दुसऱ्याला मोठे करणारा माणूस जास्त मोठा होतो.” असे गौरवोद्गार ही याप्रसंगी मार्केट यार्ड सभागृहात त्यांनी काढले.आभार प्रदर्शन चि. गौरव कुलकर्णी याने केले.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थापक अध्यक्ष श्री. अतुल ठोंबरे, श्री. संजय प्र. अयाचित, श्री. सुनिल अयाचित, जानाई सांस्कृतिक मंडळ सदस्य व विद्यार्थी मंडळ यांनी १५-२० दिवसांपासून परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *