• Thu. Jun 19th, 2025

भुजबळांच्या भाषणादरम्यानच कार्यकर्त्यांचा गोंधळ:अखेर दोन मिनिटांत उरकावे लागले भाषण; आव्हाडांचा टोला- बीडकरांना सलाम

Byjantaadmin

Aug 28, 2023

बीडमध्ये रविवारी अजित पवार गटाचा भव्य मेळावा झाला. मात्र, यावेळी मंत्री छगन भुजबळांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातला. त्यामुळे भुजबळांवर आपले भाषण आवरते घेण्याची वेळ आली.

छगन भुजबळांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे कार्यकर्ते संतापल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुढील काही मिनिटातच भुजबळांनी आपले भाषण उरकले.

बीडकरांना मानाचा मुजरा

दरम्यान, या घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा. ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.

भुजबळांची पवारांवर सडकून टीका

बीडमधील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यावरून छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता, ही खदखद छगन भुजबळ यांनी प्रथमच बोलून दाखवली. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी आपल्याला अचानक राजीनामा द्यायला लावला. ईडी कारवाईमुळे मला आणि समीर भुजबळ यांना जेलमध्ये जावे लागले. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. शरद पवारांच्या टीकेला छगन भुजबळ प्रत्युत्तर देत असतानाच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे मी दोन मिनिटांत भाषण संपवतो, असे छगन भुजबळ यांना सांगावे लागले व त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाषण आटोपते घेतले.

पावसामुळे विलंब, त्यात लांबलेले भाषण

बीडमध्ये पावसामुळे अजित पवार गटाची सभा उशिरा सुरु झाली. त्यात सर्व नेत्यांच्या भाषणामुळे सभा आणखीच लांबली. अजित पवार सर्वात शेवटी बोलेले. त्याआधी छगन भुजबळ भाषणासाठी आले होते. भुजबळ शरद पवार यांच्यावर टीका करत होते. मात्र, त्यांचे भाषण लांबत असल्याचे पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रथम टाळव्या वाजवण्यास सुरूवात केली व नंतर गोंधळ घातला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *