• Fri. Jun 20th, 2025

दयानंद कला महाविद्यालयात घेतली ‘पंचप्रण’ सामूहिक शपथ!

Byjantaadmin

Aug 27, 2023

दयानंद कला महाविद्यालयात घेतली ‘पंचप्रण’ सामूहिक शपथ!

लातूर : दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद कला महाविद्यालयात आज दि११.०८.२०२३ रोजी  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश, अभियान अंतर्गत ‘पंचप्रण’ सामूहिक शपथ संपन्न झाली. राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना समजून आत्मसात करण्याच्या उद्देशाने ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानातील एक भाग पंचप्रण शपथ घेणे हा आहे. भारत २०४७ पर्यंत आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू. अशी ही शपथ  विद्यार्थ्यांच्या मनावर देशाप्रती प्रेम, आदर, भावना निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ  शपथ घेतली असे नव्हे तर या ‘पंचप्रण’मधील घटक आत्मसात करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच मोलाचा आहे.
शपथग्रहण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पंचप्रण आत्मसात करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मराठी विभागप्रमुख डॉ. सुनीता सांगोले यांनी विद्यार्थ्यांकडून पंचप्रण शपथविधी करवून घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष कदम, कार्यक्रम अधिकारी डॅा. मच्छिंद्र खंडागळे, कला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *