• Wed. Apr 30th, 2025

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक हजार २३१ प्रकरणे निकाली !

Byjantaadmin

Nov 14, 2022

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक हजार २३१ प्रकरणे निकाली !

लातूर, (जिमाका) :राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोक अदालतीत एक हजार २३१ प्रकरणे निकाली निघाली.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भुसंपादन, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, कलम १३८ एन. आय. अॅक्टची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकांचे वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुली प्रकरणे, पोलिसांची वाहतुक ई-चलनाबाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती

मोटार वाहन अपघात विमासंबंधी प्रकरणांमध्ये विष्णू हनमंत मुरटे, शांताबाई विष्णु मुरटे, मोनिका विष्णु मुरटे वादी विरुद्ध आझाद नसरुद्दीन खान, मोहम्मद इस्राईल श. अब्दुल रहीम, एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड या प्रकरणात इन्शुरन्स कंपनीने ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. या प्रकरणात वादीचे वकील म्हणून अॅड. व्ही. ए. कुंभार यांनी तर प्रतिवादीचे वकील अॅड. एस. जी. दिवाण यांनी काम पाहिले.

दुसऱ्या प्रकरणात त्रिवणाबाई बालाजी पोकनाटे, हिरकणाबाई तिपन्ना पोकनाटे विरुद्ध प्रतीवादी वैजनाथ व्यकंटराव गोवाडे, गहिनीनाथ व्यंकटराव गोवाडे, फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी या प्रकरणात फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीने ८ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. या प्रकरणात वादीचे वकील अॅड. एस.टी. माने व प्रतिवादीचे वकील अॅड. एस.एस. मदलापूरे यांनी काम पाहिले.

लोक अदालतीसाठी जिल्ह्यात एकूण ४० पॅनलद्वारे कामकाज झाले. यात लातूर येथील पॅनलवर जिल्हा न्यायाधीश न्या. आर. बी. रोटे, न्या. जे. एम. दळवी, न्या. श्रीमती आर. एम. कदम, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. पी. बी. लोखंडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. जे. सी. ढेंगळे, न्या. पी. टी. गोटे, न्या. के. जी. चौधरी, न्या. पी. एस. चांदगुडे, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. जी. आर. ढेपे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती आर. एच. झा, न्या. श्रीमती जे. जे. माने, न्या. एम. डी. सैंदाने, न्या. श्रीमती ए. एम. शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन कामकाज पाहिले.

या लोक अदालतीमध्ये अॅड. अभिजीत गणेश मगर, अॅड. एस. जी. केंद्रे, अॅड. सुमेधा शिंदे, अॅड. अजय कलशेट्टी, अॅड. काळे संतोष, अॅड. प्रशांत मारडकर, अॅड. छाया आकाते, अॅड. वर्षा स्वामी, अॅड. लता बदने, अॅड. कल्पना भुरे, अँड. सचिन घाडगे यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर, सर्व न्यायाधीश, महाराष्ट्र राज्य बार कॉन्सिलचे सदस्य अण्णाराव पाटील, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड. विठ्ठल व्ही. देशपांडे, उपाध्यक्ष अॅड. किरणकुमार एस. किटेकर, सचिव अॅड. दौलत एस. दाताळ, महिला उपाध्यक्ष अॅड. संगिता एस. इंगळे, महिला सहसचिव सुचिता व्ही. कोंपले यांच्यासह इतर पदाधिकारी, तसेच जिल्हा सरकारी वकील अॅड. रांदड, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *