रेणुकादेवी आश्रमशाळेत ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांना मानवंदना
लातूर, – भारतीय चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल गुरुवारी तालुक्यातील वसंतनगर (महापूर) येथील इंदिरा गांधी विद्यालय व रेणुकादेवी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्यांनी साखळी करून चित्ताकर्षक व भव्य अशी ‘इस्त्रो’ व ‘भारत’ अशी मानवी साखळी तयार करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था व अवकाश तज्ज्ञांना मानवंदना दिली.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मारोती नामपल्ले व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता गोजमगुंडे यांनी सर्वांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. या उपक्रमाची संकल्पना शिक्षक धनंजय कच्छवे यांनी मांडली. यावेळी ‘चांद्रयान मोहिम आणि भविष्यातील बदल’ या संदर्भात शिक्षक गजानन काळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगीतली.
रेणुकादेवी आश्रमशाळेत ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांना मानवंदना
