• Sun. Aug 17th, 2025

मॅग्नस कार्लसन वर्ल्ड चॅम्पियन, आर प्रज्ञानानंद याचं स्वप्न भंगलं

Byjantaadmin

Aug 24, 2023

मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या आर प्रज्ञानंद याचं चेस वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा चेज वर्ल्ड कपचा विजेता ठरला आहे. टायब्रेकच्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानानंद याला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे प्रज्ञानानंद याला कमबॅक करणं अवघड झालं. कार्लसन याने पुढील गेममध्ये याने ड्रॉ केला आणि सामना जिंकला. आर प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात झालेल्या क्लासिकल प्रकारातील दोन्ही सामने हे ड्रॉ राहिले. त्यामुळे या सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये पोहचला. या टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसन याने प्रज्ञानंद याच्यावर मात करत चेज वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.

Chess World Cup 2023 Final Result | मॅग्नस कार्लसन वर्ल्ड चॅम्पियन, आर प्रज्ञानानंद याचं स्वप्न भंगलं

 

 

मॅग्नस कार्लसन चेज वर्ल्ड चॅम्पियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *