बंडखोरीनंतर आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी प्रतिज्ञापत्रांद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सहा हजार पानांचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरूवात झाल्याची माहिती आहे. यामुळे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेसह १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला वेग आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांनी सादर केलेल्या संपूर्ण सहा हजार पानांतील मुद्द्यांच्या मांडणीनंतरच १६ आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांच्या सहा हजार पानी उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांनी उत्तरात कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ‘आम्हीच शिवसेना’, कसे आहोत हे पटवून देण्याचाही प्रयत्नही केला आहे. या सहा हजार पानात त्यांनी स्पष्टीकरण देताना काही पुरावेही सादर केले आहेत. तर उर्वरित पुरावे प्रत्यक्ष सुनावणी वेळी सादर करणार असल्याचाही दावा shinde gat तील आमदारांनी लेखी उत्तरात केला आहे.शिवसेनेतील बंडानंतर माजी मुख्यमंत्री udhav thakre मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर निकाल देताना यावर कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा असल्याचे न्यायालयाने सांगितले. अध्यक्षांनी या प्रकरणी विहित वेळेत निकाले देणे अपेक्षित असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.आता ठाकरे गटाच्या निशाण्यावर असलेल्या बंडखोर १६ आमदारांनी तब्बल सहा हजार पानांचे उत्तर सादर केले आहे. या उत्तराचा अभ्यास विधिमंडळाकडून सुरू झाला आहे. त्यामुळे यावर सुनावणी होऊन राहुल नार्वेकर लवकरच निर्णय देतील, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विहित वेळेत म्हणजे तीन महिन्यात निकाल देणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत १० ऑगस्ट रोजीच संपली. मात्र या प्रकरणी उत्तर देण्यासाठी मला वेळेचे बंधन नसल्याचा दावाही नार्वेकरांनी केला होता. तसेच या प्रकरणी अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. आता त्या आमदारांनी आपले म्हणणे सहा हजार पानांत दिले असून या उत्तराचे विश्लेषण, अभ्यास विधिमंडळाकडून सुरू करण्यात आला आहे. यामुळे शिंदे गटाच्या आमदार अपात्रेचा निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.