• Mon. Aug 18th, 2025

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा

Byjantaadmin

Aug 23, 2023
बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा.
लालबाग-परेल (प्रतिनिधी-खलील शिरगांवकर) दिनांक २२ ऑगस्ट रोजी बालकलाकार आर्य महेश्वर तेटांबे याचा १५ वा वाढदिवस, आर्यने लहानपणीच वडील महेश्वर तेटांबे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रांत भरारी घेतली असुन त्याने आतापर्यंत बऱ्याच लघुपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या आर्य परेल येथील मनपाच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत दहावी इयत्तेत शिकत असुन आर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे कोरोना काळात देखील आर्यने आपला वाढदिवस मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता आणि याही वर्षी आर्य  याने आपला १५ वा वाढदिवस थाटात साजरा न करता गरीब गोरगरिबांना खाद्यपदार्थ वाटून आणि उबदार शाल प्रदान करून साध्या पद्धतीने साजरा करून आपले कर्तव्य सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *