• Mon. Aug 18th, 2025

कार-मालट्रकची धडक बसून तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

Byjantaadmin

Aug 23, 2023

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजणaccident जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत.

 

बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०) यांचा समावेश आहे.रांजणगाव येथून पहाटे एका ईको मोटारीतून (एमएच ४६-एपी ४१२०) तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महिला भाविक निघाले होते. करमाळा-टेंभुर्णीचे अंतर पार करून मोटार सोलापूरच्या दिशेने येत असताना मोहोळजवळ मोटार एका मालमोटारीला पाठीमागून जोरात आदळली आणि हा मोठा जीवघेणा अपघात झाला. यात कारचालकासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका महिलेचा सोलापूरच्या CSM सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना थोड्याच वेळात मृत्यू झाला. सहा जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *