• Tue. Aug 19th, 2025

मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढवणार , राज्य महिला आयोग मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Byjantaadmin

Aug 23, 2023

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. गावित यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतलीय. महिला आयोगाकडून विजयकुमार गावित यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. विजयकुमार गावित यांच्याकडून तीन दिवसात नोटिशीचा खुलासा आल्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. विजयकुमार गावित यांनी मासे खाल्ल्याने चेहरा चिकना आणि डोळे ऐश्वर्या राय सारखे होतात. त्यामुळे मासे खावून कुणालाही पटवून घेता येतं, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे वाद निर्माण झालाय.

मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, राज्य महिला आयोग मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *