विलास सहकारी साखर कारखाना वतीने ऊसउत्पादक महिलांसाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ विषयावर ‘महिला मेळावा’
विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी, येथे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊसउत्पादक महिलांसाठी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऊस उत्पादक महिलांचा ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ या विषयावर ‘महिला मेळावा’ गुरुवार, दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे. या महिला मेळाव्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून सभासद व ऊसउत्पादकांसाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात आलेल्या आहेत. विलास कारखाना कार्यक्षेत्रात आधुनिक ऊसशेती, ऊसाची एकरी उत्पादकता वाढविणे, ऊस शेतीमध्ये आधुनिक सिंचन व्यवस्था, ऊस शेती यांत्रीकीकरण, ऊसविकास करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत कारखान्याच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना आधुनिक ऊस शेती करण्याची माहीती झाली आहे. येथील ऊस शेतीमध्ये ऊस उत्पादक महिला शेतकरी यांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. या सर्व ऊसउत्पादक महिलांना आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञान अवगत करणे, ऊस उत्पादक महिलांना ऊस शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवून देणे व ऊस उत्पादक महिलांना ऊस शेतीमधून आत्मनिर्भर बनविणे ही काळाची गरज आहे. यासाठी ऊसउत्पादक महिलांसाठी ‘महिला मेळावा’ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत आहे. कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महीला मेळावामध्ये ‘उसाच्या सुधारित जाती आणि हंगामनिहाय उस जातीचे नियोजन’ या विषयावर वरिष्ठ शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग डॉ.जे.एम.रेपाळे, ‘उस पिकासाठी आधुनिक लागवड पध्दती आणि एकात्मिक खत व्यवस्थापन’ या विषयावर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मृदाशास्त्र विभाग डॉ.सौ.प्रिती एस. देशमुख, ‘उस शेतीमध्ये जीवाणु खतांचा वापर व महत्व’ या विषयावर शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि सुक्ष्मजीवशास्त्र विभाग सौ.सुधा डी. घोडके, ‘उसासाठी पाणी नियोजन पारंपारिक आणि सुक्ष्म सिंचन पध्दती’ या विषयावर संशोधन अधिकारी, कृषि अभियांत्रिकी विभाग शास्त्रज्ञ व शास्त्रज्ञ सौ. मोहिनी.ए. गायकवाड, उस पिकावरील रोग व किडींचे एकात्मिक नियंत्रण वरिष्ठ शास्त्रज्ञ, व प्रमुख पीक संरक्षण विभाग डॉ.बी.एच.पवार मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार, दिनांक २४.०८.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या या मेळावास ऊसउत्पादक महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.