निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख पदी ज्ञानेश्वर वाडीकर यांची नियुक्ती
निलंगा- निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या निलंगा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर वाडीकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष (मा.सेल)गोविंद सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले की,सध्या देशात वाढती महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार याने कळस गाठला असून देशातल्या जातीयवादी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन राहुल गांधी यांच्या भारत जोडो हे अभियान हाती घेऊन खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचाराचे सरकार आणण्यासाठी युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावातील पदाधिकारी दिगंबर चांदूरे, पांडुरंग भोसले,कमलाकर मेहत्रे, ओम सावंत,विनोद मुगणले, युवराज रूपणर,साधू भोसले, सचिन भोसले,सोमनाथ सुरवसे,भोसले सोमनाथ,आकाश भोसले, अमोल दूधभाते,विठ्ठल गुजले,परमेश्वर भोसले,संभाजी धानुरे,नागू भोसले,महेश सावंत,अमोल भोसले,अक्षय शेळके,विष्णू भोसले,तुकाराम मेहत्रे, सहदेव भोसले,पिंटू भोसले,विकास मंडले, दादाराव भोसले,विनोद गलांडे,जीवन शेळके यांच्या उपस्थितीत निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्यालयात देण्यात आले.