• Tue. Aug 19th, 2025

केंद्र सरकार नामर्द, आंदोलन करणार!:वाजपेयींचे सरकार पडले म्हणून एवढे घाबरता का? कांदा प्रश्नावरून बच्चू कडूंचा हल्लाबोल

Byjantaadmin

Aug 22, 2023

केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतला, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही?, केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग विभाग आपल्यादारी या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडमध्ये आले असता त्यांनी सरकारवर टीका केली.

‘ही’ नालायक प्रवृत्ती

बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, कांदा परवडत नसेल तर खावू नये म्हणता माझ्याकडे लसूण आहे. मुळाही आहे, अशी टीका त्यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता केली. सरकार खाणाऱ्यांचा विचार करते. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.

कांद्याच्या भावावारुन सरकार पडले

बच्चू कडू म्हणाले की, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे.पण त्यामुळे केंद्र सरकारने इतके घाबरण्याची काय गरज आहे? मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल ना, आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. एकही जागा न मागता एनडीएला ताकदीने पाठिंबा देऊ, सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *