सोयाबीन पिकाला हेक्टरी 50 हजार अनुदान व कोरडा दुष्काळ जाहीर करा- अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यामध्ये गेल्या एक महिण्यापासून पावसाने दांडी मारल्याने व येल्लो मोझक या रोगामुळे फुलोऱ्यात आलेले सोयाबीन हे कोमेजून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याने हातचे नगदी पीक निघून गेल्यामुळे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये व पीक विमा देऊन निलंगा देवणी,शिरूरअनंतपाळ तालुके कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू.अशी मागणी अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केली.
यावेळी प्रमुख उपस्थितीत अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सोनाजी कदम,नगरसेवक अशोक शेटकार, निलंगा ता.अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष लाला पटेल,प्रदेश सरचिटणीस ऍड तिरुपती शिंदे,लातूर जि. काँग्रेस कमिटीचे जि.उपाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, नणंदचे सरपंच हरी बोळे, ग्राहक सेलचे तालुकाध्यक्ष भरत बियाणी,उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी,वंचितचे महासचिव देवदत्त सुर्यवंशी,सचिव अबरार देशमुख,महेश चिकराळे,शहर चिटणीस अजय कांबळे, तुषार सोमवंशी, सोहेल शेख,विजयकुमार पाटील,सुभाष नाईकवाडे दादगी,गोविंद सिंदखेड चे सवळसुरे,दयानंद मुळे, बेंडगाचे गोविंद धुमाळ,दापकाचे बब्रू पठाण,सुधाकर जाधव,सतीश जोशी, दादाराव जाधव इ कार्यकर्ते व पदाधिकारी होते.