माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात संपन्न
निलंगा-देशाचे माजी पंतप्रधान आधुनिक तंत्रज्ञान युगाचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपाइं सरचिटणीस विलास सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अशोकराव पाटील म्हणाले की, स्व.राजीव गांधी यांच्यामुळेच 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार मिळाला.देशात इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आज आपल्या हातात मोबाईल आला तसेच संगणक जे की आपण एका बटनामध्ये संपुर्ण जग पाहू शकतो ही किमया राजीव गांधी प्रत्येक जनमानसात रुजविली.परंतु याचा वापर चुकीच्या मार्गाने होऊ नये याची खबरदारी आजच्या युवकांनी घेतली पाहिजे आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर देशात जातीयवाद धर्माधर्मामध्ये भांडण लावणे यावर आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र होउन याचा बिमोड केला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी रिपाई नेते विलास सूर्यवंशी,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे यानी पण आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे, माजी नगरसेवक प्रकाश बाचके,सिराज देशमुख, तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष लाला पटेल, काँग्रेस प्रवक्ते पुरूषोत्तम कुलकर्णी, शहरसचिव महेश चिकराळे, निलंगा तालुका सोशल मीडिया काँग्रेसचे प्रमुख ज्ञानेश्वर वाडीकर,मौला मणियार,तुषार सोमवंशी, लतीफ पटेल, बबलू जाधव,रिझवान शेख,सोहेल शेख,अनिल अग्रवाल,शिरू शिंदे इ कार्यकते व पदाधिकारी उपस्थित होते.