• Tue. Aug 19th, 2025

काँग्रेसच्या व्यासपीठावर कलावती, अमित शाहांना सुनावले, म्हणाल्या …

Byjantaadmin

Aug 21, 2023

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या कलावती यांनी रविवारी काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना खडे बोल सुनावले. विदर्भात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील या कलावती आहेत. त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातून येतात. २००८ मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती व त्यांची परिस्थिती समजून घेतली होती. या घटनेची खुप चर्चा झाली होती. राहुल यांच्या प्रयत्नांमुळे कलावती यांना सरकारी योजनांचा लाभ झाला. व्यक्तिगतपातळीवरही त्यांना राहुल यांच्याकडून मदत झाली होती.नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी याच घटनेचा उल्लेख करीत कलावती यांना राहुल गांधी यांनी नव्हे तर भाजप सरकारने मदत केल्याचा दावा केला होता.

Kalawati participate in congress program in nagpur

 

त्यामुळे कलावती पुन्हा एकदा चर्चेत आल्या. कलावती यांनी दुसऱ्याच दिवशी शाहा यांचा दावा खोढून काढला होता. रविवारी नागपुरात राजीव गांधी यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यात congress प्रदेशाध्यक्ष nana patole यांच्यासह कलावतीही सहभागी झाल्या. आणि त्यांनी येथे पुन्हा अमित शाहा याना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या “amit shah खोटे बोलत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्यानेच मुलीचा विवाह पार पडला. यावेळी कलावती यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष अर्पण करून त्यांना अभिवादन केले व गांधी कुटुंबीयांप्रति कृतज्ञताही व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *