अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात एका भारतीय कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि 6 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दुहेरी हत्या आणि आत्महत्येचे आहे.
तिघेही मूळचे भारतातील कर्नाटक राज्यातील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे शुक्रवारी बाल्टिमोर काउंटीमधील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले. योगेश एच नागराजप्पा (37), प्रतिभा वाय अमरनाथ (३7) आणि यश होनल (6) अशी मृतांची नावे आहेत.

भारतातील कुटुंबीयांना दिली माहिती
बाल्टिमोरच्या वृत्तपत्र सनने बाल्टिमोर काउंटी पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण दुहेरी हत्या आणि आत्महत्येचे असल्याचे दिसते. योगेशने ही घटना घडवल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशने आधी पत्नी आणि मुलाला गोळी मारली असावी आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असावी. तिघांच्याही शरिरावर जणांवर गोळ्यांच्या खुणा आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी हे कुटुंब अखेरचे दिसले होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण व प्रकार कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाल्टिमोर काउंटीच्या एक्झिक्युटिव्हने निवेदनात म्हटले की, या घटनेत मारल्या गेलेल्या लोकांबद्दल त्यांना खूप दुःख झाले आहे. जवळपास राहणाऱ्या लोकांना कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, योगेशच्या आईने सांगितले की, तिला बाल्टिमोर पोलिसांचा फोन आला होता, त्यांनी सांगितले की, तिघांचाही आत्महत्यामुळे मृत्यू झाला आहे. ते मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत.
योगेशच्या कुटुंबीयांनी मृतांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
9 वर्षांपासून राहत होता अमेरिकेत
योगेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या नऊ वर्षांपासून अमेरिकेत राहत होते. ते आणि त्यांची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. योगेशचा चुलत भाऊ संतोष याने सांगितले की, दोघेही खूप आनंदी होते तरीही त्यांनी असे का केले हे आम्हाला माहिती नाही.
संतोष पुढे म्हणाले की, मृतदेह परत आणण्यासाठी उपायुक्त आणि एसपी यांच्याशी बोललो आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.