• Wed. Aug 20th, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Byjantaadmin

Aug 18, 2023

मुंबई, दि. 18 :- माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यानिमित्त पाळण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.

वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी आदींना सद्भावनादिनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार अनिल बाबर, आमदार संजय शिरसाट, आमदार अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, मंत्रालय प्रांगण येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जयंतीनिमित्त दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *