माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुखयांच्या हस्ते लातूर शहरातील पहिल्या इंडसइंड बँकेच्या शाखेचा शुभारंभ
लातूर ;- इंडसइंड बँकेच्या नव्याने सुरू होत असलेल्या शाखेमधून ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून इंडसइंड बँकेच्या माध्यमातून येथील उद्योग व्यापारा बरोबर लातूरच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.लातूर शहरातील कामदार रोड येथील पहिल्या इंडसइंड बँक शाखेचा शुभारंभ शुक्रवार दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव-रमेश बियाणी, चार्टड अकाऊंटंट प्रकाश कासट, इंडसइंड बँकेचे सोलापूर विभाग प्रमुख- सतीश कुंकरे, मॅनेजर-संदीप सरवदे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, मनपाचे माजी सदस्य कैलास कांबळे, युनूस मोमीन, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, बाभळगाव ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद देशमुख, अभिषेक पतंगे, ऍड. गोपाळ बुरबुरे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, इंडसइंड बँकेचे
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील सुप्रसिद्ध सीए प्रकाश कासट यांच्या कामदार रोड परिसरातील कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
————