• Mon. Aug 18th, 2025

ऊस शेतीतील होणारे बदल आणि ऊसशेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शनन करण्यासाठी विलास कारखाना येथे ऊस विकास परीसंवाद संपन्न

Byjantaadmin

Aug 18, 2023

ऊस शेतीतील होणारे बदल आणि ऊसशेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी विलास कारखाना येथे ऊस विकास परीसंवाद संपन्न

दि. १८ ऑगस्ट २३ : वैशालीनगर, निवळी, येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. येथे कारखाना  कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊसशेतीमध्ये दिवसेदिवस होत असलेले बदल आणि आधुनीक ऊसशेतीचे ज्ञान देता यावे यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आणि ऊस विकास परीसंवाद कार्यक्रम शेतकी विभागातील कर्मचारी यांच्यासाठी आयोजित
करण्यात आला होता. या परिषदेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु) पूणे यथील तज्ञांनी मार्गदर्शन केले. विलास सहाकरी साखर कारखाना कार्यस्थळी गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी एक दिवसीय प्रशिक्षण आणि ऊस विकास परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास व्हा.चेअरमन रवीद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव
देसाई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील शास्त्रज्ञ व मुख्य जनसंपर्क अधिकारी आर बी. भोईटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्री. एस. जी. दळवी, डॉ. श्री. जी. आर. पवार आणि वरिष्ठ ऊस रोग विकृती शास्त्रज्ञ डॉ. श्री. जी. एस. कोटगीरे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन डीग्रसे यांनी मार्गदर्शन केले. विलास सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच ऊसवीकासाचे नवनवीत तंत्र  कारखाना कर्मचारी आणि सभासद, ऊसउत्पादक यांना अवगत व्हावे यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले. राज्याचे माजी वैदयकीय व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई
विलासरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतुन ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल व आधुनिक ऊसयोती पध्दती यांचा अभ्यास होणेसाठी व त्यांचा वापर कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांना करता यावा याकरीता एक दिवशीय प्रशिक्षण व ऊस विकास परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात वसंतदादा शुगर इनस्टिटयुट, मांजरी (बु) लातूर येथे पूणे यांचे तज्ञा मार्फत शेतकी विभागातील कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. यावेळी तज्ञांनी ऊस लागवड, निंदणी, पाणी व्यवस्थापन, खते व्यवस्थापन, कीटकनाशक व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, ऊस तोडणी आणि ऊस गाळप या विषयांवर ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल आणि आधुनिक पद्धती यांचा वापर करून ऊस उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल ऊस उत्पादकांना माहिती दिली. तज्ञांना ऊस उत्पादकांनी ऊस शेतीशी संबंधित विविध प्रश्न विचारले. ऊस उत्पादकांच्या या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. ऊस उत्पादकांना ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून ऊस उत्पादन वाढवतायेईल यांची माहीती मिळाली. यावेळी बोलतांना कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे म्हणाले, ऊस शेतीसाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान आवगत करुन त्याचा वापर कारखाना
परिसरांतील ऊस उत्पादकांसाठी करुन हेक्टरी उत्पादकता वाढवावी असे कृषी विभागातील कर्मचारी यांना सांगीतले. तर संचालक अनंत बारबोले यांनी कमी कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादकता वाढविण्याचा मंत्र सर्व ऊत्पादकां पर्यंत पोहोचला पाहिजे. तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. संजीव देसाई यांनी ऊस उत्पादकांची हेक्टरी ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी विविध नाविन्यपुर्ण ऊस विकासाचे उपक्रम आपल्या कारखान्याकडून सातत्याने राबविले जातात. यापूढे देखील अशा प्रकारचे उपक्रम आणि योजना कारखाना परिसरांमध्ये राबविल्या जातील असे सांगितले. या एक दिवशीय प्रशिक्षण व ऊस विकास परिसंवादात वसंतदादा शुगर इनस्टिटयुट येथील तज्ञ श्री.आर.बी.भोईटे (शास्त्रज्ञ व मुख्य जनसंपर्क अधिकारी व्हि.एस.आय.) डॉ.श्री. एस.जी.दळवी (वरिष्ठ शास्त्रज्ञ ), डॉ.श्री.जी.आर. पवार व त्याच्या सोबत डॉ.श्री.जी.एस. कोटगीरे (वरिष्ठ ऊस रोग विकृती शास्त्रज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. सदरील एकदिवशीय परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुत्रसंचलन श्री. शेख यांनी केले तर अभार श्री. एस. डी. नरवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ऊस विकास अधिकारी श्री. जहागीरदार सी.एम., शेतकी अधिकारी श्री. आनेराये एस.एस., कृषि पर्यवेक्षक, श्री सोमासे, श्री. देसाई श्री. मेंढेकर, श्री. पाटील श्री. नवनाथ पाटील, श्री. कदम सर्व कृषि मदतणीस व सर्व शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थीत होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासठी श्री. निकम ए. एन., श्री. भिसे एस.डी., श्री. दिलीप सोनकांबळे, श री. दगडु काटकर, श्री. सुर्यवंशी एस. एस. यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *